‘सुवर्ण सिंहासन’ डॉ. अतुल भोसले अन् धरकऱ्यांसोबत सिद्धीस नेणार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

संभाजीराव भिडे (गुरुजी); दुर्गदुर्गेश्वर रायगडावर जूनच्या सुरुवातीस भूमिपूजन सोहळा 

कराड/प्रतिनिधी : – 

‘हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन’ पूनरसंस्थापनेची जबाबदारी माझ्यावर सोपवा. त्यासाठी आपण लागेल ती मदत करू, अशी इच्छा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यासारख्या तरुण, तडफदार, ध्येयवादी व्यक्तींसह श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना सोबत घेऊन येत्या दीड ते पावणेदोन वर्षांत ‘सुवर्ण सिंहासन’ पूनरसंस्थापण संकल्प सिद्धीस नेणार असल्याचे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले.

किल्ले रायगड : श्री उमरठ ते श्री रायगड धारातीर्थ यात्रा गडकोट मोहिमेस उपस्थित धारकरी व जनसमुदाय.

धारातीर्थ यात्रा गडकोट मोहीम : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानतर्फे काढण्यात आलेल्या ‘श्री उमरठं ते श्री रायगड धारातीर्थ यात्रा गडकोट मोहीम २०२५’ च्या सांगता समारंभात मंगळवारी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : व्यासपीठावर आमदार सुधीर गाडगीळ, आमदार भरत गोगावले, आमदार महेश लांडगे, आमदार नीतेश राणे, आमदार अशोक माने आदींसह प्रतिष्ठानचे सरसेनापती रावसाहेब देसाई, रायगडचे पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री शिवप्रतिष्ठानचा संकल्प : राजधानी किल्ले रायगडवर पूर्वी असलेल्या स्वराज्य निर्माते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य’बत्तीस मण सुवर्ण सिंहासन’ची पूनरसंस्थापण करण्याचा संकल्प २०१६ मध्ये श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानतर्फे करण्यात आला होता. त्याचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याचे सांगत श्री भिडे गुरुजी म्हणाले, खरेतर, महाराजांचे ३२ मणचं काय तर ६४ किंबहुना ९६ मणाचे ‘सुवर्ण सिंहासन’ निर्माण करायला हवे. यासाठी प्रत्येकाने स्वेच्छेने निधी द्यावा. त्यातून संपूर्ण जगाला हेवा वाटेल, असे ‘सुवर्ण सिंहासन’ राजधानी किल्ले रायगडवर निर्माण करायचे आहे. या सिंहासनावर छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्ती विराजमान असतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

जूनच्या सुरुवातील भूमिपूजन सोहळा 

किल्ले रायगडवर उभारण्यात येणाऱ्या ‘बत्तीस मण सुवर्ण सिंहासन’चा भूमिपूजन सोहळा येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला रायगडवर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केली. 

गावोगावी खडा पहारा पथक

सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणाची जबाबदारी ही श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानची असून त्याबाबत कोणत्याही प्रकारे शासनावर अवलंबून राहणार नाही. सिंहासनाच्या संरक्षणासाठी गावोगावी ‘सुवर्ण सिंहासन खडा पहारा’ पथकांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रतिदिवशी दहा हजार  धारकरी रायगडावर सेवेसाठी जाणार असल्याचे श्री भिडे गुरुजी यांनी सांगितले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!