कराडच्या मॅरेथॉनसाठी सुमारे 3 हजार स्पर्धकांची नावनोंदणी – रणजीतनाना पाटील
कराड/प्रतिनिधी : –
राज्याचे कॉमन मॅन उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते व गुरूवर्य एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे रस्ता सुरक्षा मॅरेथॉनचे आयोजन रविवार (दि. ९) रोजी करण्यात आले आहे. या मॅरेथॉनच्या फलकाचे अनावरण ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेची माहिती घेऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वाढदिनी रस्ता सुरक्षा मॅरेथॉन : कराड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक रणजीतनाना पाटील मित्र परिवार व कराड आरटीओ विभाग यांच्यावतीने रस्ता सुरक्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन हजार जणांनी नोंदणी : ही मॅरेथॉन निःशुल्क असून नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारअखेर सुमारे तीन हजार जणांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून मॅरेथॉनचे टी-शर्ट वाटप लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानात होणार आहे. यासाठी रविवारी पहाटे लवकर स्पर्धा स्थळी यावे, असे आवाहन रणजीतनाना पाटील यांनी केले आहे.
सुविधा : या स्पर्धेचा मार्गावर विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल दिले जाणार आहे. धाव मार्गावर ठिकठिकाणी पाणी वाटप, तसेच एनर्जी ड्रिंक दिले जाणार आहे. याशिवाय स्पर्धकांसाठी नाष्ट्याची सोयही लिबर्टी मैदानावर करण्यात आली आहे.
आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही दिल्या शुभेच्छा
आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही मॅरेथॉन तयारीचा आढावा रणजीतनाना पाटील यांच्याकडून घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा मॅरेथॉन मध्ये स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. भोसले यांनी केले. मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन कराडमध्ये करण्याचा प्रयत्न, तसेच कराडला हेल्थ हब बनवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले.
