कराड अर्बन बँकेच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी – सचिन लोखंडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सांगोला/प्रतिनिधी : – 

कराड अर्बन बँकेच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजकांनी आपली प्रगती साधावी, असे आवाहन सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेता सचिन लोखंडे यांनी केले.

वाहन वितरण : कराड अर्बन बँकेच्या सांगोला शाखेच्यावतीने आयोजित वाहन वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश काशीद यांच्या हस्ते उद्योजक उत्तम ढोले यांना इनोव्हा तर पत्रकार अरुण लिगाडे यांना बलेनो गाडीचे वितरण करण्यात आले.

शाखेने प्रगती सध्या केली : यावेळी बोलताना सांगोला शाखेचे शाखा व्यवस्थापक बसवेश्वर चेणगे म्हणाले की, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, पुणे विभागाचे उप महाव्यवस्थापक रविंद्र कांबळे तसेच सोलापूर विभागाचे सहा. महाव्यवस्थापक सुरज शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेने प्रगती साध्य केली आहे. 

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास राजेंद्र यादव, सुरेश गंभीरे, किशोर म्हमाणे, अच्युत फुले, अधिकारी सुरज जाधव, याकुब शेख, राजेश कटकधोंड, गणेश हिरोळी आदी उपस्थित होते.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!