कराड/प्रतिनिधी : –
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिदिन 7,500 मे.टनावरून 11,000 मे.टन विस्तारवाढ प्रकल्पामधील 150 टन/प्रतितास क्षमतेच्या नवीन बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याच्या संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या शुक्रवार (दि. 7) रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
आवाहन : तरी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभास ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.
