अरुण मोरे (फौजी) यांची सामाजिक बांधिलकी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कै. रामचंद्र ज्ञानोबा भोसले विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप 

कराड/प्रतिनिधी : – 

सावली प्रतिष्ठान, कुंभारगावचे सदस्य अरुण मोरे (फौजी) यांच्या वाढदिनी माणकेश्वर ग्रामविकास संस्था, खोडशी संचलित कै. रामचंद्र ज्ञानोबा भोसले माध्यमिक विद्यालय, खोडशी या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

सामाजिक उपक्रम : सावली फाउंडेशन, कुंभारगाव हा सामाजिक ग्रुप असून या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबविले आहेत. अरुण मोरे (फौजी) हे सध्या भारतीय लष्कर सेवेत कार्यरत असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी सावली फाउंडेशनचे संस्थापक प्रा. सुरेश यादव, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार घारे, शिक्षक आशालता पवार, एस. एस. पवार, के. एस. पाटील, एस. एम. पाटील व एन. ए. चव्हाण उपस्थित होते.

बहुमोल मार्गदर्शन : प्रा. सुरेश यादव यांनी याप्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी आपले धेय्य निश्चित करण्याची हीच वेळ असून अभ्यासाचे योग्य नियोजन, सराव आणि उजळणीवर भर देऊन आपल्या स्वप्नवत उद्दिष्टपूर्तीकडे पहिले यशस्वी पाऊल टाका, असे आवाहनही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. 

मोलाचे योगदान : हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील वरेकर, सुरेश चिखले, ऋषिकेश बोत्रे, विश्वनाथ चिखले, अमोल चिखले, जालिंदर यादव, निलेश चिखले, पवन मोरे, रवी काटे, डॉ. शोभा चाळके, साहिल धोत्रे, संदीप चिखले, शंकर मोरे, सुहास यादव, उत्तम मोरे, विशाल यादव, विश्वास चिखले, युवराज धोत्रे यांनी परिश्रम घेतले.

सहकार्य : कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार घारे, सूत्रसंचालन नानासाहेब चव्हाण, तर आशालता पवार यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!