350 बैलगाड्यांचा सहभाग; 51 फेऱ्यांमध्ये उडाला धुरळा
कराड प्रतिनिधी : –
सुर्ली (ता. कराड) येथे नुकत्याच झालेल्या बैलगाडी शर्यतीत यशवंत जोशी व बापूसाहेब भाडळे यांची बैलजोडी प्रथम येत एक लाख रुपयांच्या बक्षिसची मानकरी ठरली. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते त्यांना बक्षीस देण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, शंकर शेजवळ, प्रशांत भोसले, महेशकुमार जाधव, नवीन जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अत्यंत चुरशीने या बैलगाडी शर्यती पार पडल्या.
वाढदिवसानिमित्त आयोजन : भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यतीमध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांतून बैलगाडी मालकांनी हजेरी लावली होती.
350 बैलगाड्यांचा सहभाग : या शर्यतीमध्ये एकूण 350 बैलगाड्या या शर्यतीसाठी सहभागी झाल्या होत्या. एकूण 51 फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली.
अटीतटीच्या लढती : अतिशय अटीतटीच्या वातावरणात पार पडलेल्या या मैदानात रामभाऊ जोशी व बापूसाहेब भाडळे दैवत गोळेकर यांची बैलजोडी प्रथम, अनिल मोरे लाडेगाव व निळेश्वर प्रसन्न व यांची द्वितीय, आई तुळजाभवानी अथर्व कोळी कडेगाव तृतीय, रायफल उर्फ नखरा व राणा सातारा चतुर्थ, पाचवा क्रमांक जय हनुमान प्रसन्न गोट्या बाळा चिंचणी यांचा, सहावा क्रमांक निळेश्वर प्रसन्न वडोली निळेश्वर रोहित डुबल युवा प्रतिष्ठान वडोली, तर चिठ्ठीद्वारे तुषार घोरपडे सदाशिवगड व गणेश ऑटो गॅरेज कामठी यांच्या बैलजोडीचा सातवा क्रमांक आला.
योगदान : या स्पर्धेसाठी रामकृष्ण वेताळ, उद्योजक प्रदीप वेताळ, सुरजाई क्रिकेट क्लब, सचिन पवार, संयम कन्स्ट्रक्शन संतोष वेताळ, सुरेश वलेकर, संभाजी वेताळ कृष्णत वेताळ यांनी बक्षीसांसाठी रक्कम दिली.
गौरव : विजेत्या बैलजोड्यांना चषक, शाल, श्रीफळ, रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
सहकार्य : या शर्यतीसाठी समालोचक म्हणून विजय यादव, झेंडा पंच सलीम मुलाणी, हलगी वादक बाळासाहेब साठे, मंडप अभिजीत पोळ यांनी सहकार्य केले. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर यांनी प्रयत्न केले.
