कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ७६ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संचालक बाजीराव निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण : जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात कृष्णा कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कारखाना कार्यस्थळावर संरक्षण विभागाकडून शानदार ध्वजसंचलन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संचालक धोंडीराम जाधव, शिवाजी पाटील, अविनाश खरात, जनरल मॅनेजर ( टेक्निकल) बालाजी पबसेटवार, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, एम के कापूरकर यांच्यासह खातेप्रमुख,अधिकारी ,कर्मचारी, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
