कृष्णा विश्व विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या प्रांगणात कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहाच्यावतीने ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील सिक्युरिटी फोर्सचे जवान आणि विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांनी शानदार ध्वजसंचलन केले.

ध्वजारोहण : कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. यानंतर कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा व उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांनी सुरक्षारक्षक आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेटस् कडून मानवंदना स्वीकारली.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, विद्यापीठाचे कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. जी. व्ही. रामदास, कृष्णा कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजसंचलन : ध्वजवंदनानंतर कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील विविध सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी सुरक्षा अधिकारी दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शानदार ध्वजसंचलन केले. तसेच यावेळी कृष्णा शैक्षणिक समूहातील विविध शाळा – महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

उपस्थिती : याप्रसंगी कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजूलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी पाटील आदींसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!