प्रजासत्ताक दिनी विजय स्मृतीस्तंभास मानवंदना
कराड/प्रतिनिधी : –
विजय दिवस समारोह समितीच्या वतीने शहिद जवानांच्या स्मरणार्थ कराड येथील विजय दिवस चौकात स्मृती स्तंभाची स्थापना केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून शहिद जवानांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कार : याप्रसंगी संदिप पवार यांनी विजयस्तंभावर कायमस्वरूपी लाईट डेकोरैशन केल्याबद्दल त्यांचा श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
80 हजार रक्तांच्या बाटल्यांचे संकलन : सागर पाटील यांनी अनेक रक्तदान शिबीर घेऊन ८० हजार रक्ताच्या बाटल्या संकलित करून राष्ट्रीय रेकॉर्ड केल्याबद्दल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विजय दिवस समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव यांच्या हस्ते शरद गाडे यांचाही सत्कार करण्यात आला.
नव दाम्पत्यही स्मृतीस्तंभावर नतमस्तक : प्रजासत्ताक दिनी चि. आकाश अर्जुगडे व चि.सौ.का. मंदिरा या नव दाम्पत्यानी मान्यवरांच्या उपस्थितीत विजय स्तंभावर नतमस्तक होऊन पुष्पचक्र वाहिले. याबद्दल त्यांचाची सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवर : याप्रसंगी विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष अरूण जाधव, चंद्रकांत जाधव, विनायक विभूते, सहसचिव विलासराव जाधव, प्राचार्य गणपतराव कनसे प्रा. भगवान खोत, प्रा. महालिंग मुंढेकर, प्रत्रकार हेमंत पवार, उद्योजक जयदिप अर्बुने, नगर अभियंता ए.आर. पवार, संतोष पवार, श्रीमती सुनीता जाधव, मिनाक्षी जाधव, पोर्णिमा जाधव, साधना राजमाने, माजी नगरसेवक, उद्यान ग्रूपचे सदस्य व माजी सैनिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
