डॉ. नितीन नांगरे यांची माहिती; सवलतीच्या दरात होणार आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया
कराड/प्रतिनिधी : –
येथील श्री बालाजी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांना माफक दरात आरोग्य सेवा देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जनरल सर्जन डॉ. नितीन नागरे यांनी केले.
पत्रकार परिषद : सदर शिबिराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. इंद्रजीत पाटील, डॉ. विजय खरगे, डॉ. हर्ष सायगावकर व डॉ. सौ. सायगावकर मॅडम यांची उपस्थिती होती.
नव्या इमारतीत प्रवेश : श्री बालाजी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा आता नव्या इमारतीमध्ये प्रवेश होत असल्यास सांगत डॉ. नितीन नांगरे म्हणाले,गेल्या 70 दशकांमध्ये सुरू असलेल्या एरम हॉस्पिटलचे 2014 मध्ये शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल असे नामकरण करण्यात आले. आता या वास्तूचे हस्तांतरण श्री बालाजी हेल्थ इन्स्टिट्यूट प्रा. लि. यांच्याकडे आल्यावर त्याचे नामांतर श्री बालाजी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल असे करण्यात आले आहे.
समाजप्रेमी आरोग्य केंद्र : श्री बालाजी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल हे समाजप्रेमी कार्यासाठी प्रसिद्ध असलेले एक आरोग्य केंद्र असून प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत एक विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याचे डॉ. नांगरे यांनी सांगितले.
तपासण्या, शस्त्रक्रियांवर सवलत व सुविधा : यामध्ये डॉक्टर कन्सल्टेशन 100 रुपयात, रुटीन लॅप तपासणीवर 25 टक्के सवलत, सर्व शस्त्रक्रियांवर 50 टक्के सवलत व डायलिसिस दीड हजार रुपयांमध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जनरल मेडिसीन, हृदयरोग व छातीच्या शस्त्रक्रिया, आर्थोपेडिक, यूरोलॉजी, जनरल सर्जरी, कर्करोग, नेत्ररोग, लेझर शस्त्रक्रिया, न्यूरोलॉजिक व मेंदू शस्त्रक्रिया, पाय व फुगलेल्या शिरांच्या शस्त्रक्रिया, गॅस्ट्रो एंटरलॉजी व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध आहेत.
नाव नोंदणी आवश्यक : या हॉस्पिटलमधील सर्व तज्ञ डॉक्टर्वस व आरोग्य सेवा कर्मचारी यांच्यामार्फत शिबिरात तत्पर व दर्जेदार सेवा देण्यात येणार आहेत. हे शिबिर सर्व वयोगटातील लोकांसाठी खुले असून याचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
100 बेडचा प्रस्ताव सादर
श्री बालाजी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचा विस्तार करण्यात येणार असून त्यादृष्टीने शासनास 100 बेडचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल. त्यामुळे रुग्णांना आणखी तत्पर सुविधा देणे शक्य होणार असल्याचे डॉ. नितीन नांगरे यांनी सांगितले.
विशेष आधार योजना सुरू करणार
सध्या दुर्गम भागातील लोकांना विविध आजारांवरील उपचार परवडत नाहीत. सर्वसामान्य लोकांचीही अडचण होते. ही बाब लक्षात घेऊन पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी श्री बालाजी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलतर्फे विशेष आधार योजना सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे त्यांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचार शासकीय योजनांमध्ये बसत नाहीत, अशा शस्त्रक्रिया व उपचारांचाही यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. नितीन नांगरे यांनी यावेळी केले.
