शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले असून शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनात्मक फेरबदल : युवक काँग्रेसमधील संघटनात्मक पातळीवरील हे महत्वाचे फेरबदल युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहेत.

नियुक्तीपत्र प्रदान : शिवराज मोरे यांना नुकतेच दिल्ली येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब व राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलूवेरू यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उपस्थित होते.

दोनदा काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा : शिवराज मोरे यांनी याआधी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची दोनदा जबाबदारी सांभाळली असून युवक काँग्रेसचे सरचिटणीस व उपाध्यक्ष पदाची निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्ती सुद्धा झाली होती. प्रदेश युवक काँग्रेसच्या दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत शिवराज मोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

कार्यकर्त्यांना मिळणार ताकद : एका सामान्य कुटुंबातील शिवराज मोरे यांनी आपल्या संघटनेच्या जोरावर राज्यभर युवकांचे संघटन वाढवले आहे. या नियुक्तीमुळे राज्यभरातून युवक काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना ताकद मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!