मनोगत : चित्रलेखा माने-कदम यांनी कराड उत्तरमध्ये मनोजदादांच्या विजयासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याने त्यांचा विजय साकार झाल्याचे सांगितले. प्रिया शिंदे यांनी मनोजदादांचे महिलांसाठी असणारे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तेजस्विनी घोरपडे यांनी कराड उत्तरमधील माता-भगिनी आमचे कुटुंबच असून त्यांची काळजी घेणे आमच्या संपूर्ण घोरपडे कुटुंबियांची जबाबदारी असल्याचे सांगितले. तर समता घोरपडे यांनी आमदार मनोजदादा संपूर्ण कराड उत्तरमधील माता-भगिनींचे दादा असून ते त्यांच्या सुखदुःखामध्ये कायमच सोबत राहतील.
खेळ पैठणीचा : याप्रसंगी होम मिनिस्टर फेम दीपक साबळे यांच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाने महिलांचे चांगलेच मनोरंजन झाले. याप्रसंगी विविध बक्षिसांची खैरात वाटण्यात आली. तेजल शिंदे, धनश्री काटकर यांच्या नृत्याविष्कारावर उपस्थित महिलांनी ठेका धरल्याचे दिसून आले.
उपस्थिती : यावेळी विश्रांती साळुंखे, विजया गुरव, सारिका निकम, पायल जाधव, स्वाती डहाणे, प्रतिभा कांबळे, सीमा घार्गे, रूपाली घाडगे, अमिता जाधव यमुना जाधव, स्नेहल कांबळे, प्रभावती सूर्यवंशी, विजया पवार सुनिता मगर, रूपाली मोहिते, शुभांगी माने, शशिकला जाधव, प्रज्ञा देशमाने, पल्लवी साळुंखे, सुजाता उपरे, राजश्री घार्गे, धनश्री सावंत यांच्यासह स्वाभिमानी महिला सखी मंच व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कराड उत्तरमधील माता-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
माता -भगिनींच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील
कराड उत्तरमधील माता-भगिनींचे आशीर्वाद आजपर्यंत माझ्या सोबत आहेत. येथून पुढे सुद्धा त्यांच्या आशीर्वाद माझ्यासोबत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत माता-भगिनींच्या सर्व अडचणी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन, अशी ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी यावेळी दिली.