दिपालीताई खोत यांची माहिती; 100 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला लाभ
कराड/प्रतिनिधी : –
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर मागासवर्ग महामंडळांच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कराडमध्ये आयोजित मार्गदर्शन मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याचा तब्बल 100 पेक्षा जास्त युवक, युवती व नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती लाडकी बहीण योजनेच्या कराड उत्तर तालुकाध्यक्षा दीपलीताई खोत यांनी दिली.
मार्गदर्शन मेळावा : कराड दक्षिण भाजपच्या वतीने भाजप किसान मोर्चाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष भरत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय योजनांची युवक, युवती व सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी, त्याचा त्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवार (दि. २३) रोजी सकाळी १२.३० ते २ या वेळेत सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन : या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे श्री माने, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे सुदर्शन शिंदे आणि महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे अनंत सोनवणे यांनी मेळाव्यास उपस्थित युवक, युवती व नागरिकांना सदर महामंडळाच्या विविध योजना व त्याचा लाभ घेण्यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या विविध कागदपत्रांचीही यावेळी माहिती देण्यात आली.
100 पेक्षा जास्त जणांनी घेतलेला लाभ : या मार्गदर्शन मेळाव्याचा जवळपास 100 पेक्षा जणांनी लाभ घेतल्याची माहिती दीपालीताई खोत यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती : या मेळाव्यास भाजप कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भरत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, अनुसूचित जाती जमाती कराड तालुकाध्यक्ष जगन्नाथ वाघमारे, अनुसूचित जाती जमाती युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पै. क्षितीज वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन पायंडा : या मेळाव्याच्या यशस्वीतेबाबत बोलताना सौ. खोत म्हणाल्या, विविध महामंडळाच्या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा व्हावा, त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे होते. यापूर्वी अशा प्रकारचे कार्यक्रम फार कमी प्रमाणात झाल्याचे दिसते. परंतु, भरतनाना देसाई यांनी हा नवीन पायंडा पाडला असून याचा कराड दक्षिणमधील अनेक नागरिकांना फायदा झाला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात असे मेळावे घेणार : कराड येथील मेळावा यशस्वी झाला असून याचा आदर्श घेत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात अशा प्रकारचे मार्गदर्शन मिळावे घेण्यात येणार असल्याचे दीपालीताई खोत यांनी सांगितले.
बहुमोल योगदान : हा मेळावा यशस्वी करण्यासाठी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भरत देसाई, अनुसूचित जाती जमाती कराड तालुकाध्यक्ष जगन्नाथ वाघमारे, अनुसूचित जाती जमाती युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पै. क्षितीज वाघमारे यांनी प्रयत्न केले.
