महात्मा फुले व अन्य महामंडळांच्या योजनांबाबत मार्गदर्शन मेळावा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराडमध्ये आज आयोजन; युवक, युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन 

कराड/प्रतिनिधी : –

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व इतर मागास वर्ग महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्याकडील सर्व योजनांची माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी कराडमध्ये आज गुरुवार (दि. २३) रोजी सकाळी १२.३० ते २ या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष भरत देसाई, तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे कराड तालुकाध्यक्ष जगन्नाथ वाघमारे व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष क्षितिज वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

मेळाव्याचा उद्देश : केंद्र व राज्य शासनामार्फत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व इतर मागास वर्ग महामंडळातर्फे युवक, युतींसाठी अनेक योजना राबवली जातात. परंतु, त्याची सविस्तर माहिती नसल्याने बहुतांश जणांना त्याचा लाभ घेता येत नाही. यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी मिळून शासनाच्या सर्व योजना तळागाळातील इच्छुक लाभार्थ्यांना देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नवीन उद्योजक उभे राहण्यास मदत : या माध्यमातून युवक, युवतींना या महामंडळाच्या मार्फत मिळणाऱ्या विविध योजना व नवीन उद्योग, व्यवसायाचे ज्ञान मिळेल. यातून नवीन उद्योजक उभे राहतील. सर्वसामान्य नागरिकांचे कौटुंबिक स्वास्थ व आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होऊन केंद्र व राज्य शासनाचे उद्देश यशस्वी होतील.

वेळ व ठिकाण : येथील शासकीय विश्रामगृहात गुरूवार (दि. 23) रोजी सकाळी 12.30 ते 2 या वेळेत हा मेळावा पार पडणार असून यामध्ये सातारा जिल्हा उद्योग केंद्र, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आवाहन : तरी कराड तालुक्यातील सर्व युवक, युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भरत देसाई, तसेच जगन्नाथ वाघमारे व क्षितिज वाघमारे यांनी केले आहे. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!