कराड/प्रतिनिधी : –
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी निमित्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू सडोली संघाने अजिंक्यपद पटकावले. तर इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर संघ स्पर्धेत उपविजेता ठरला.
बक्षीस वितरण : बक्षीस वितरणप्रसंगी संचालक लिंबाजीराव पाटील, धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, अविनाश खरात, प्रभारी कार्यकारी संचालक पंडित पाटील, मनोज पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, एम.के.कापूरकर, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले.
अष्टपैलू खेळाडू : कराडच्या रामकृष्ण वेताळ संघाने तृतीय क्रमांक, तर जयंत स्पोर्ट्स इस्लामपूर या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. शाहू सडोली संघाचा रोहित साठे हा अष्टपैलू खेळाडूचा मानकरी ठरला. इस्लामपूर व्यायाम मंडळ संघाचा अभिराज पवार उत्कृष्ट चढाईचा मानकरी, तर शाहू सडोलीचा अक्षय पाटील उत्कृष्ट पकडचा मानकरी ठरला.
निरीक्षक व पंच : रमेश देशमुख यांनी स्पर्धेचे पंचप्रमुख, शशिकांत यादव यांनी सहाय्यक म्हणून, तर समीर थोरात यांनी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. संजय पाटील, प्रा. अमोल मंडले, प्रा. महेश कुंभार, ज्ञानदेव पाटील, राहुल निकम आदींनी स्पर्धेचे संयोजन केले.
उपस्थिती : याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आबा मोहिते, नवनाथ डोईफोडे, सचिन जाधव, कोयना दूध संघाचे संचालक शिवाजी जाधव, टेक्निकल को ऑर्डिनेटर एस. डी. कुलकर्णी आदींसह कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.