नवरात्रोत्सवास प्रारंभ; महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कासेगाव/प्रतिनिधी : –
कासेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील ग्रामदेवता श्री चौण्डेश्वरी देवीची आज यात्रा असून आज सोमवार (दि. 13) रोजीपासून देवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे.
शांकभरी पौर्णिमा : श्री महिषासुरमर्दिनी ग्रामदेवता श्री चौण्डेश्वरी देवीची आज शांकभरी पौर्णिमेच्या निमित्त सोमवार (दि. 13) रोजी कासेगाव येथे मोठी यात्रा भरते. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाप्रसादाचे आयोजन : सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत भाविक, भक्त व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादासाठी दान स्वरूपात गुळ, गहू, तांदूळ, दूध, तूप, तेल आदी साहित्य देवीच्या मंदिरात रविवारी सायंकाळपर्यंत जमा करावे, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
देवीची भव्य मिरवणूक : सोमवारी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत गावातून देवीची भव्य मिरवणूक निघणार काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत भाविक, भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री चौण्डेश्वरी देवी यात्रा कमिटी व कासेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.