बीड घटनेवर पृथ्वीराज चव्हाण आक्रमक; उच्चपदस्थांचे राजीनामे घेऊन कडक कारवाईची मागणी
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास आहे. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लागेल, अशा घटना वारंवार होत आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण त्याचेच एक उदाहरण आहे. त्यामुळे सरकारने सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख जपावी. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.













