कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखाना व कृष्णा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगार व माता-बालक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 217 जणांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले.
उद्घाटन : कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक महावीर घोडके, बहे गावचे माजी उपसरपंच मनोज पाटील, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, मालखेड विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष सदाशिव भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऊसतोड मजुरांच्या प्रकृतीची काळजी : यावेळी बोलताना जगदीश जगताप म्हणाले, चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना नेहमीच ऊसतोड मजुरांच्या प्रकृतीची काळजी घेत आला आहे. करोनातही ऊसतोड मजुरांची काळजी कृष्णा कारखान्याने घेतली होती. यापुढेही त्यांची काळजी कृष्णा कारखाना घेणार आहे. शिबिराची सुरुवात धंन्वतरी व स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
सहकार्य : कृष्णा हॉस्पीटल वैद्यकिय पथकातील डॉ. प्रतीक पाटील, डॉ. राजवर्धन सूर्यवंशी, डॉ. कविशा तिवारी, डॉ. चिरंत नाडीग, डॉ. उतरेश्वर भिंगे, डॉ. आदित्य खाडे, डॉ. मयूर जगताप, डॉ. प्रथमेश कराड, डॉ. हर्षल निंबाळकर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल निकम, सुनील यादव यांच्यासह वैद्यकीय स्टाफ यांचे या शिबिरास सहकार्य लाभले.
