बंधुता परिषद व आपुलकी मेळावा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

लोककल्याण मंडळ ट्रस्टतर्फे उद्या कराडमध्ये आयोजन; बाबासाहेबांच्या भेटीला 85 वर्षे पूर्ण 

कराड/प्रतिनिधी : –

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 2 जानेवारी 1940 या दिवशी कराडमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून बाबासाहेबांनी भेट दिलेल्या ठिकाणी श्री भवानी संघ स्थानावर लोककल्याण मंडळ ट्रस्टद्वारे सामाजिक सलोखा दृढ व्हावा, यासाठी बंधुता परिषद 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.

प्रसिद्धीपत्रक : सदर बंधुता परिषद व आपुलकी मेळाव्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संघाचे प्रचारक सुयोग किरपेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

भेटीचे स्मरण : माणसा माणसात वैचारिक मतभेद असले, तरी एकमेकांच्या विचारांचा आदर करून सामाजिक सलोखा जपता येऊ शकतो. यातूनच बंधुता निर्माण होते. याच प्रकारचा संदेश डॉ. आंबेडकर यांनी कराडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात दिला होता. त्याचे स्मरण म्हणून कराडच्या या ऐतिहासीक संघ शाखेत बंधुता परिषद आणि आपुलकी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

परिसंवाद : या बंधुता परिषदेनिमित्त आयोजित परिसंवादात बौध्द युवक संघटनेचे अध्यक्ष ॲड. विजय गव्हाळे, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, राज्यसभेचे माजी खासदार प्रा. अमर साबळे आणि विचारवंत ॲड. क्षितिज गायकवाड सहभागी होणार आहेत. सदर परिसंवादाचे अध्यक्षस्थान विवेक विचार मंचाचे अध्यक्ष, माजी खासदार प्रदीपदादा रावत भुषवणार आहेत.

वेळ व ठिकाण : गुरुवार (दि. 2) जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता ऐतिहासिक भवानी मैदान, पंतांचा कोट, सोमवार पेठ, कराड येथे ही बंधुता परिषद व आपुलकी मेळावा होणार आहे.

आवाहन : या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराडच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!