‘कृष्णा’च्या महिला शेतकरी ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी रवाना

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

‘व्हीएसआय’चे पुणे येथे चार दिवसीय शिबिर

कराड/प्रतिनिधी : –

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवशीय शिबिरासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 18 महिला शेतकरी रवाना झाल्या असून, त्यांना अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे गिरवण्याची संधी मिळणार आहे.

प्रशिक्षण : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे शेतकर्‍यांना दरवर्षी ऊस शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊसाच्या प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील महिला शेतकर्‍यांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

शुभेच्छा : पुणे येथे आयोजित शिबिरासाठी  रवाना झालेल्या महिला शेतकऱ्यांना चेअरमन डॉ. सुरेश भोसले, संचालक संजय पाटील, विलास भंडारे,  वैभव जाखले, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार यांनी शुभेच्छा दिल्या.

तज्ञांकडून मार्गदर्शन : या शिबिरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.  

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी टेक्निकल को ऑर्डीनेटर डी. एस. कुलकर्णी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, एच. आर. मॅनेजर संदीप भोसले, फायनान्स मॅनेजर राजाराम चन्ने, जनरल मॅनेजर डिस्टीलरी विकास आभाळे, को जन मॅनेजर गिरीष इस्लामपूरकर, परचेस मॅनेजर विक्रमसिंह माने, वैद्यकिय अधिकारी हर्षल निकम, प्रभारी कार्यालयीन अधीक्षक विलास पाटील, शिवाजी बाबर, अजय दुपटे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!