महंमद रफी यांना अजरामर गीतांतून आदरांजली
कराड/प्रतिनिधी : –
महान गायक महंमद रफी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या अजरामर गीतांना उजाळा देण्यात आला. बहारो फूल बरसाओ..तुम मुझे यूं भुला ना पाओगे..पुकारता चला हू मै..तेरी बिंदीया रे..ओ जब याद आयें..अशी अनेक बहारदार गीते कार्यक्रमात सादर झाली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कराड येथील महंमद रफी म्युझिक अॅकॅडमीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती : प्रारंभी, महंमद रफी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवाडी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
गीतांचे सादरीकरण : महागुरू असिफ बागवान यांच्या बहारो फूल बरसाओ या गीताचे कार्यक्रमाची दमदार सुरूवात झाली. यानंतर तुम मुझे यू ..प्रा. संजय पाटील, लिखे जो खत तुझे मं.अनिस, पुकारता चला हूं मै.. नजीर मुलाणी, ये दिल तुम बिन कही लगता नही.. असिफ सर व जमिला मुलाणी, क्या देखते हो.. असिफ सर व नलिनी बैले.. मस्त बहारों का..देवेंद्र साळुंखे, तेरी गलियो में..डॉ.राजेश कुलकर्णी..वादियां तेर दामन.. अशोक मोहने, बेखुदी में सनम.. मं. अनिस व मुनिरा पठाण अशी सरस गीते गायक कलाकारांनी सादर केली.
रसिक स्रोत्यांची दाद : उत्तरोत्तर कार्यक्रम अधिक रंगत गेला. आने से उसके आये बहार..दिल तोडने वाले.., क्या हुवा तेरा वादा..गुलाबी आंखें..चले थे साथ मिलकर..लागी छेटे ना.. झिल मिल सितारोंका..आज कल तरे मेरे..दर्दे दिल..परदा है परदा अशी बहारदार गाणी सादर झाली.
उत्स्फूर्त प्रतिसाद : कार्यक्रमास रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची संकल्पना महागुरू असिफ बागवान व मोहंमद अनिस यांची होती.