बॅरिस्टर विक्रम कुलकर्णी; ‘टिळक’मध्ये खाद्य महोत्सव उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
पाककला हे मानवी जीवनातील खूप मोठे कौशल्य असून ते आता उदरनिर्वाहाचे फार मोठे साधन आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये रुचकर व पौष्टिक भारतीय खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. म्हणून विद्यार्थिनींनी पाककलेमध्ये प्राविण्य प्राप्त करावे, असे प्रतिपादन शिक्षण मंडळ, कराडचे संचालक बॅरिस्टर विक्रम कुलकर्णी यांनी केले.
खाद्य महोत्सव : शिक्षण मंडळ, कराड संचालित टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित खाद्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भित्तिपत्रकाचे उद्घाटन : याप्रसंगी गृहशास्त्र विभागाने तयार केलेल्या हिवाळ्यातील रुचकर व पौष्टिक पदार्थ या भित्तिपत्रकाचे व समाजशास्त्र विभागाने तयार केलेल्या भारतीय व पश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचे योगदान या विषयावरील भित्तिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
खाद्यपदार्थांची मेजवानी : खाद्य महोत्सवात विद्यार्थिनींनी अत्यंत स्वादिष्ट, रुचकर खमंग मुगाचे मेथीचे पराठे, पुलाव, थालीपीठ, बाजरीची भाकरी खर्डा, पाणीपुरी, समोसे, दूध खीर, पावभाजी, केक, लाडू, बटाटा, चिक्की, खारी शेंगदाणे असे विविध पदार्थ मानले होते.
परीक्षण : खाद्यपदार्थांचे परीक्षण मानसी जोशी व सविता जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे योग्य नियोजन गृहशास्त्र विभागाच्या प्रमुख सीमा पाटील यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास प्राचार्य धनाजी देसाई, उपप्राचार्य अरुण कोडोली, पर्यवेक्षक राजेश धुळुगडे, कार्याध्यक्षा सुनिता पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.