जखिणवाडी (नांदलापूर) ता. कराड येथील श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
उपयुक्त माहिती : याप्रसंगी बोलताना शेती मित्र अशोकराव थोरात यांनी या दिनदर्शिकेमध्ये सर्व प्रकारची माहिती असून सर्वांसाठी ती उपयुक्त असल्याचे सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संस्थेचे चेअरमन अजित थोरात, व्हा. चेअरमन चंद्रकांत टंकसाळे, माजी चेअरमन अरुणादेवी पाटील, अरुण पवार, वसंत चव्हाण, मारुती रावते, दत्तात्रय लावंड, भीमाशंकर माऊर, अविनाश पाटील, नंदकुमार संमुख, अनिल शिर्के, दगडू पवार, मलकापूरचे माजी नगरसेवक राजू मुल्ला, आण्णासो काशीद, तसेच मलकापूर, नांदलापूर, जखिणवाडी मधील ग्रामस्थ व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्जेराव शिंदे, शाखाधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.