निराधारांना मिळाली मायेची ऊब 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सामाजिक बांधिलकीतून ब्लॅंकेटचे वाटप; सामाजिक संस्था, संघटनांचा सहभाग 

कराड/प्रतिनिधी : – 

येथील ब्रदर्स फाऊंडेशन, मानव परिवर्तन व विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था आणि आस्था सामाजिक संस्थेतर्फे कराडमधील गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

40-50 गरजूंना लाभ : सध्या थंडीच कडाका चांगलाच वाढला आहे. परंतु, रस्त्याकडेला, तसेच उपस्थानक विविध चौकामध्ये आसरा घेणाऱ्या निराधारांना या थंडीत कुडकडत रात्र काढावी लागत आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याचे सुमारास शहरातील शाहू चौक, तसेच बस स्थानक परिसर व इतर रस्त्यांच्या कडेला फुटपाथ वर झोपलेल्या निराधारांना पाहून त्यांना सामाजिक बांधिलकीच्या जाणीव वेतन मायेची उप देण्यासाठी ब्रदर्स फाऊंडेशन, मानव परिवर्तन व विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था आणि आस्था सामाजिक संस्थेतर्फे 40-50 गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. 

सहभाग : यावेळी स्वाती पिसाळ, जय सूर्यवंशी, राधिका पन्हाळे, मंजिरी कुलकर्णी, रुपाली मॅडम, ऊषा मॅडम, महेश सर, चिन्मय हापसे, विनायक मोहिते, स्वराज कुंभार, विशाल हापसे, स्वप्निल मुळीक, आकाश मुळीक, दिनेश मुटेकर, आप्पा मंकादार, अभिषेक शेटे, अभी पवार, मंदार मोरे, ऋषिकेश कांबळे, रविराज रैनाक, आकिब मुल्ला, नदिम पालकर, विशाल संकपाळ, अशितोष मुळे, सागर पाटील, स्वप्नील माने व मित्र परिवार यांनी सहभागी होत हा उपक्रम राबवला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!