कराड/प्रतिनिधी : –
भारताने बांग्लामुक्ती संग्रामात मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ कराडला कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 1998 पासून येथे विजय दिवस समारोह साजरा होत आहे. त्याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या विजय दिवसाच्या कार्यक्रमांची सुरुवात कराड दौडने शनिवारी करण्यात आली.
प्रारंभ : येथील शिवतीर्थ दत्त चौकात भारतीय सैन्यदलाच्या मराठा लाईट इंन्फंट्रीच्या जवानांचे बॅण्ड पथकातील जवानांनी वाजवलेल्या जयोस्तुत्ये या गीताने दौडला प्रारंभ करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : माजी आमदार आनंदराव पाटील, विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचिव विलासराव जाधव, संचालक विनायक विभुते, चंद्रकांत जाधव, सलीम मुजावर, प्रा. बी. एस. खोत, सागर बर्गे, ए. आर. पवार, रत्नाकर शानभाग, प्रा. महालिंग मुंढेकर, प्रसाद पावसकर, चंद्रशेखर नकाते, शामसुंदर मुसळे, प्रफुल्ल ठाकूर, जयकर पवार, रमेश शहा, आत्माराम अर्जुगडे, संजय डवरी, सौफुल्ला मोमीन, शंकर वेताळ, महेंद्र भोसले, मोहनराव डोळ, सुहास भुंजे आदिंच्या उपस्थितीत झाला.
दौडचा मार्ग व सांगता : ही दौड दत्त चौकातून आझाद चौक, चावडी चौक मार्गे कन्याशाळेसमोरुन कृष्णा नाका मार्गे शिवाजी उद्यान परिसरात नेण्यात आली. तेथे त्या दौडीचा समारोप झाला.
सहभाग : या दौडीमध्ये रोटरी क्लब, हास्य क्लबचे सदस्य, टिळक हायस्कूल, यशवंत हायस्कूल, लाहोटी कन्याशाळा, संत तुकाराम हायस्कूल, पालिका शाळा क्रमांक तीन, पालिका, जेष्ठ नागरिक संघ, दक्ष नागरिक पोलिस मित्र संघटना, शिवाजी उद्यान ग्रुप, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
घोषणा : यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान, जय किसान आदी घोषणा दिल्याने चांगलीच वातावरण निर्मिती झाली. महेंद्र भोसले यांनी सुत्रसंचालन केले. अॅड. संभाजीराव मोहिते यांनी आभार मानले.