कराड शहर भाजपचेरत्नेश्वराला साकडे; मंदिरात घातला अभिषेक
कराड/प्रतिनिधी : –
भाजप नेते देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांची मुख्यमंत्रीपदी आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित जायंट किलर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची मंत्रीपदी वर्णी लागावी, यासाठी कृष्णामाई घाट परिसरातील श्री रत्नेश्वर मंदिरात अभिषेक घालण्यात आला.
कार्यकर्त्यांची साकडे : भाजप कराड शहरच्यावतीने शहराध्यक्ष एकनाथ बागडी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रत्नेश्वराला साकडे घातले.
मान्यवरांचा उपस्थिती : यावेळी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद शिंदे, अनुसूचित जिल्हाउपाध्यक्ष सागर लादे, शहर सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, विश्वनाथ फुटाणे, रुपेश मुळे, मुकुंद चरेगावकर, रमेश मोहिते, संजय शहा, प्रितेश मेहता, केतन शहा, विशाल कुलकर्णी, सौरभ शहा, अनिल पवार, सोपान तावरे, पल्लवी तावरे, राहुल आवटी, सौरभ शहा, राजेंद्र खोत, मंजिरी कुलकर्णी, धनश्री रोकडे, कविता माने, स्वाती मोहिते, दैवशीला मोहिते, सुमन बागडी, राजश्री कारंडे, रोहिणी साळवी, चेतन थोरवडे, नितीन भोसले तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी हजर होते.