कराड उत्तरमध्ये मनोजदादा घोरपडे यांचा करिष्मा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचा दारूण पराभव 

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात इतिहास घडवत भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार माजी सहकारमंत्री, विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांचा दारूण पराभव केला. मनोज घोरपडे यांना 1 लाख 34 हजार 626 मते मिळाली. तर विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना 90 हजार 935 मते मिळाली. या ठिकाणी मनोज घोरपडे यांचा 43 हजार 691 मतांनी मोठा विजयी झाला. 

बालेकिल्ल्याला खिंडार : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. परंतु, या बालेकिल्लाला खिंडार पाडत भाजपने कमळ फुलवल्याने माजी सहकारमंत्र्यांचा झालेला नामुष्कीजनक पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले.

पहिल्या फेरीपासून आघाडी : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात झाली. याठिकाणी पहिल्या फेरीत मनोज घोरपडे यांनी विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या 2884 मतांची लीड घेतले. त्यानंतर हे लीड आमदार बाळासाहेब पाटील यांना अपवाद वगळता शेवटपर्यंत तोडता आले नाही.

जल्लोषाला सुरुवात : पहिल्या सातव्या – आठव्या फेऱ्यांमध्येच मनोज घोरपडे यांनी तब्बल 18 हजार पेक्षा जास्त मतांचे निर्णायक लीड घेतल्याने घोरपडे समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषास सुरुवात केली. 

विजयाची घोषणा : निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी मनोज घोरपडे यांना विजय घोषित केले. या ठिकाणी मनोज घोरपडे यांना एक1 लाख 34 हजार 626 मते मिळाली. तर बाळासाहेब पाटील यांना 90935 मते मिळाली. याठिकाणी मनोज घोरपडे यांचा 43 हजार 691 मतांनी विजय झाला. यानंतर मनोज घोरपडे यांनी कराड येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.

शेवटपर्यंत आघाडी : पहिल्या फेरीतच मनोज घोरपडे यांना 2 हजार 884 एवढे मताधिक्क्य मिळाले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत 5 हजार 719, तिसऱ्या फेरीत 7 हजार 344, चौथ्या फेरीत 11 हजार 710, पाचव्या फेरीत 13 हजार 330, सहाव्या फेरीमध्ये 15 हजार 715, सातव्या फेरीत 19 हजार 173, आठव्या फेरीत 21 हजार 547, नवव्या फेरीत 23 हजार 396 तर दहाव्या फेरीत मनोज घोरपडे यांनी मताधिक्क्याचा 25 हजाराचा आकडा ओलांडला. दहाव्या फेरीपुर्वीच घोरपडेंचा विजय निश्चित झालेला. त्यापुढे केवळ मतांची आघाडी किती, याची उत्सुकता समर्थकांसह कार्यकर्त्यांना लागून राहिली होती. अकराव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत त्यांनी अनुक्रमे 26 हजार 577, 29 हजार 177, 29 हजार 612 आणि 31 हजार 666 एवढे मताधिक्क्य मिळवले. त्यानंतरच्या पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस आणि वीस या फेऱ्यामध्ये त्यांच्या मताधिक्क्याचा आकडा वाढतच गेला. विसाच्या फेरीअखेर त्यांना 39 हजार 209 मतांची आघाडी घेत चाळीस हजाराच्या मताधिक्क्याकडे मुसंडी मारली. अखेरच्या सहा फेऱ्यांमध्ये त्यांनी हा आकडा ओलांडत पंचवीसाच्या फेरीअखेर तब्बल 43 हजार 691 एवढे मताधिक्क्य मिळवून बाळासाहेब पाटील यांचा दारुण पराभव केला.

जल्लोष अन् गुलालाची उधळण

कराड येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी सुरू झाली. मनोज घोरपडे यांचे समर्थक व कार्यकर्ते सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी केंद्राबाहेर थांबून होते. पहिल्या फेरीपासून घोरपडेंना आघाडी मिळत असल्याचे दिसताच समर्थकांची गर्दी आणि या गर्दीचा आवाजही वाढत गेला. प्रत्येक फेरीतील मताधिक्क्याचा आकडा जाहिर होताच कार्यकर्त्यांच्या घोषणांचा आवाज चढत होता. मनोज घोरपडे यांच्या विजयाची खात्री होताच दहाव्या फेरीपासून केंद्राबाहेर फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण सुरू झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!