कराड/प्रतिनिधी : –
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारासाठी शहरातील वॉर्ड क्र. 9 मध्ये प्रचार फेरीचा शुभारंभ सकाळी शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या हस्ते मारुती मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून प्रचार फेरीस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कराड शहरासह कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. अतुलबाबांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी मतदारांना केले.
या परिसरात प्रचार पूर्णत्वास : या प्रचार फेरीत बुधवार, दि. 13 रोजी सकाळी वॉर्ड क्र. 9 मधील मारुती मंदिर परिसर, पायऱ्याखालील भाग, मेन रोड दोन्ही बाजू, लल्लूभाई चाळ, यशवंत हायस्कूल मागील सर्व परिसर, तेली गल्ली गणपती मंदिरामागील परिसर, मुळीक गल्ली, वडार नाका इथपर्यंत प्रचार पूर्ण करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, अनुसूचित जिल्हा उपाध्यक्ष सागर लादे, शहर सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, विश्वनाथ फुटाणे, कृष्णा चौगुले, रमेश मोहिते, सोपान तावरे, राहुल आवटी, सौरभ शहा, राजेंद्र खोत, स्वाती मोहिते, मंजिरी कुलकर्णी, कविता माने, स्वाती पिसाळ, दैवशीला मोहिते, तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.