तुकोबारायांच्या तपोभूमीला पृथ्वीराजबाबांमुळे सुरक्षितता 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा 

कराड/प्रतिनिधी : – 

पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी श्री क्षेत्र देहू जवळील संत तुकोबारायांची ध्यान साधना तपोभूमी भंडारा भामचंद्र डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून सन 2011 ला घोषित केले. तसेच त्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक, पुरातत्व विभागाद्वारे अधिसूचनाही जारी केली. त्यामुळे या संपूर्ण पवित्र क्षेत्राला आज सुरक्षितता प्रदान झाली आहे. हे पवित्र काम आपणच पूर्ण करू शकाल, विश्वास व्यक्त करत संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

आ. चव्हाण व सौ. सत्वशीला चव्हाण यांचा सत्कार : तपोभूमीतील या समितीचे संस्थापक तुकोबाभक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देवून आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी आ. चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सत्वशीला चव्हाण यांचा वारकरी शाल, तुळशीचा हार घालून सत्कार केला.

डाऊप्रमाणे पुन्हा वारकऱ्यांवर आंदोलनाची वेळ : वारकरी धर्माचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने सदर न्याय्य अधिसूचनांचे कायदेशीर पालन होण्यासाठी त्वरीत अद्यादेश काढावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा व संघर्ष केला. परंतु, आपल्यानंतर कोणत्याच सरकारने संवेदनशीलपणे या मागणीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे डाऊप्रमाणे पुन्हा वारकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली असल्याचे मत मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले. 

आपणास मुख्यमंत्री म्हणून पुन:श्च भाग्य लाभावे : आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलताना शिष्टमंडळातील सदस्य म्हणाले, आपणच हे पवित्र काम पूर्ण करू शकाल, असा आम्हा वारकऱ्यांना विश्वास आहे. त्यासाठी आपणास मुख्यमंत्री म्हणून पुन:श्च भाग्य लाभून हे ऐतिहासिक कार्य आपल्या हातून पार पाडावे. यासाठी राज्यातील तमाम जनता, वारकरी, फडकरी दिंडीच्यावतीने आपणास जाहीर पाठिंबा देत आहोत. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!