अजय सूर्यवंशी यांचा मानस; कराड उत्तरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापितांची हुकूमशाही सुरू आहे. ती हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी, तसेच मतदारसंघातील गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती अजय सूर्यवंशी यांनी दिली.
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून अजय सूर्यवंशी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी माध्यमांची संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांचे समर्थक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण :अजय सूर्यवंशी हा एका सामान्य घरातील युवक उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. त्याला सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण असून उत्तरेतील सुज्ञ मतदारही त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला.
यासाठी निवडणूक रिंगणात : गेले दहा वर्ष कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अजय सूर्यवंशी यांनी त्यांच्या कामातून केले आहे. मतदारसंघातील अनेक नागरिकांना अद्याप घरकुल मिळाले नसून अन्य प्रलंबित रस्त्यांची कामे, शैक्षणिक संस्थांची उभारणी आणि मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी बेरोजगारी निर्मूलन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी या निवडणुकीला अजय सूर्यवंशी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी यावेळी दिली.