कराड/प्रतिनिधी : –
ब्रह्मदास ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या., बेलवडे बुद्रुक

, ता. कराड या संस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता ब्रह्मदास ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या., बेलवडे बुद्रुक येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे चेअरमन श्री. मारुती राजाराम मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेपुढील विषय : दि. 29/09/2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन 2023-2024 या आर्थिक वर्षाच्या संस्थेच्या कामकाजाबद्दलचा अहवाल, लेखापरिक्षीत ताळेबंद व नफा तोटा पत्रक मंजूर करणे, सन 2023-2024 च्या संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा वाटणीस मंजूरी देणे, सन 2023-2024 सालात अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे व 2024-2025 सालाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, सन 2023-2024 सालाचा वैधानिक लेखापरिक्षण अहवाल वाचून नोंद घेणे, सन 2024-20245 या सालासाठी लेखापरिक्षकांची नेमणूक करणे व मेहनताना ठरविणे, संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे, वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे, प्रशिक्षण, कर्ज, गुंतवणुक व वसुली व तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे, संस्थेच्या पोटनियम दुरुस्तीस मान्यता देणेबाबत, अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे, त्यानंतर आभार व समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
तरी या सभेस सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक मंडळाच्या आदेशावरून संस्थेचे व्यवस्थापक श्री. उमेश वसंतराव पाटील यांनी केले आहे.
ब्रह्मदास महिला पतसंस्थेचीही वार्षिक सभा
ब्रह्मदास ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या., बेलवडे बुद्रुक या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी सकाळी 10 वाजता ब्रह्मदास महिला ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या., बेलवडे बुद्रुक, ता. कराड या संस्थेची ही वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या चेअरमन सौ. उज्वला वसंतराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी या सभेस सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या व्यवस्थापिका सौ. स्वाती प्रवीण मोहिते यांनी केले आहे.
