कामगारांच्या कल्याणासाठी महायुती शासन खंबीर 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शिंदेवाडी-विंग येथे बांधकाम कामगार संमेलन उत्साहात; लाभार्थींना साहित्याचे वितरण

कराड/प्रतिनिधी : –

राज्याच्या विकासात सर्वस्तरातील कामगारांचे मोठे योगदान आहे. या कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना बळकटी मिळवून देण्यासाठी महायुती शासन खंबीर असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. 

भाजप कामगार मोर्चा कराड दक्षिणच्यावतीने शिंदेवाडी-विंग येथील समर्थ मल्टीपर्पज हॉलमध्ये भव्य बांधकाम कामगार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात ना. खाडे यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील सुमारे २,४९२ लाभार्थी बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना भांडी वाटप व बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

लाडक्या बहिणींना दुप्पट लाभ : माहिती सरकारने महिना महिलांच्या सन्मानार्थ सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत बोलताना मंत्री खाडे ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सध्या रक्कम दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. परंतु, आता दीड हजार रुपयांवरून ही रक्कम दुप्पट करत तब्बल 3 हजार रुपये करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

घरेलू कामगारांनाही 10 हजार व गृहोपयोगी वस्तूंचा संच : महायुतीचे शासन सर्वस्तरातील लोकांसाठी विविध योजना राबवित आहे. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लाभ मिळवून दिले जात आहेत. याचा लाभ कामगारांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा. कामगारांची नोंदणी सुलभतेने होण्यासाठी तालुकास्तरावर विशेष सेतू केंद्र सुरु करण्यात येत आहेत. बांधकाम कामगारांबरोबरच सन्मानधन योजनेंतर्गत वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत पात्र घरेलू कामगारांच्या बँक खात्यात थेट 10 हजार रुपये जमा केले जात आहेत. घरेलू कामगारांनाही गृहोपयोगी वस्तू संच देऊन, त्यांना मायेची ऊब देण्याचा महायुती शासनाचा प्रयत्न आहे. घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभासाठी शासनाने मोठी तरतूद केली असल्याचेही ना. खाडे यांनी सांगितले. 

कराड तालुक्यात सर्वाधिक बांधकाम कामगारांची नोंद : याप्रसंगी बोलताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यामध्ये सर्वाधिक बांधकाम कामगारांची नोंद झाली आहे. अधिकाधिक पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महायुती शासन प्रयत्नशील असून, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लोकांना याबाबतची माहिती देत आहोत. तसेच त्यांच्यासाठी विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जिल्ह्याचे कामगार आयुक्त रेवणसिद्ध भिसले, कामगार आयुक्त नितीन पाटणकर, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे, सौ. शामबाला घोडके, समृद्धी जाधव, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ उमराणी, तालुकाध्यक्ष रुपेश देसाई, योगेश पाटील, सागर पाटील, विकास साळुंखे यांच्यासह बांधकाम कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!