येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन श्री राजन वसंतराव वेळापुरे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे कुंटुबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता श्री कृष्णाबाई प्रीतिसंगम सांस्कृतिक केंद्र (नविन) 375, सोमवार पेठ, कराड येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक वेळापुरे यांनी केले आहे.
वार्षिक सभेपुढील विषय :
या सभेमध्ये सभेची नोटीस वाचन करणे, मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे, सन 2023- 2024 या आर्थिक वर्षाचा संचालक मंडळाने मंजुर केलेला अहवाल ताळेबंद व नफा-तोटा पत्रक वाचून मंजूर करणे, संचालक मंडळाच्या शिफारशी प्रमाणे सन 2023- 2024 सालाचे नफा वाटणीस मंजुरी देणे व लाभांश जाहीर करणे, सन 2023- 2024 चा सरकारी लेखापरीक्षण अहवाल वाचून त्यास मान्यता देणे, सन 2024-2025 सालाकरिता वैधानिक लेखापरिक्षकाची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे, सन 2023- 2024 च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाच्या दोषदुरूस्ती पूर्तता अहवालाची नोंद घेणे, सन 2024- 2025 सालासाठी अंदाजपत्रक मंजूर करणे, सन 2023- 2024 सालचे अंदाजपत्रकाहुन जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे, सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे, तसेच ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा संस्थेचे चेअरमन साहेब यांच्या पूर्व परवानगीने विचार करणे, याप्रमाणे कामे होणार आहेत.
तरी संस्थेच्या सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विवेक वेळापुरे यांनी केले आहे.