राजेश पवार यांचा ‘धर्मप्रचारक पुरस्कार २०२६’ने सन्मान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पश्चिम महाराष्ट्रातील धर्मप्रसार कार्याचा गौरव; स्वामी समर्थ सेवेद्वारे लोककल्याणाची दखल

कराड/प्रतिनिधी : –

पश्चिम महाराष्ट्रात हिंदू संस्कृतीचा प्रसार आणि समाजहिताच्या कार्यात सातत्याने योगदान देणारे आगाशिवनगर (मलकापूर), ता. कराड येथील राजेश पवार यांना ‘धर्मप्रचारक पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

वितरण सोहळा : हिंदू एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अक्षय तृतीया व शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर मलकापूर येथे आयोजित समारंभात श्री. पवार यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

योगदानाची दखल : श्री स्वामी समर्थांच्या सेवेतून समाजकल्याणाचे कार्य, तसेच धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांचा प्रचार-प्रसार या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत श्री. पवार यांना हा सन्मान देण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : या प्रसंगी मलकापूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, हिंदू एकता आंदोलनचे प्रांतीय अध्यक्ष विनायक पावसकर, राहुल यादव, राहुल शेवाळे, आण्णा माळी यांच्यासह विविध शासकीय व प्रशासकीय अधिकारी, नगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, शिवभक्त, भाविक आणि स्वामी समर्थ सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रेरणादायी : राजेश पवार यांनी गेल्या काही वर्षांत श्री स्वामी समर्थांच्या सेवेद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबवले असून, त्यातून समाजातील विविध घटकांपर्यंत धार्मिक जागृती पोहोचविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना मिळालेला हा सन्मान सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अभिनंदन व शुभेच्छा : या गौरवाबद्दल पश्चिम महाराष्ट्र ग्राम-अभियान टीम, समस्त स्वामी भक्त, तसेच सेवेकरी परिवाराकडून राजेश पवार यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!