कराड युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची देवदास माने यांची निवड 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

संघटनात्मक फेरबदल; युवकांची ताकद वाढवण्यावर भर 

कराड/प्रतिनिधी : – 

सातारा जिल्हा युवक काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, कराड तालुक्याच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदी देवदास दत्तात्रय माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज बापूसाहेब मोरे यांच्या हस्ते माने यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

बैठक : ही नियुक्ती सातारा येथे पार पडलेल्या युवक काँग्रेसच्या बैठकीत जाहीर करण्यात आली. बैठकीत संघटन विस्तार, आगामी राजकीय रणनीती आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर सखोल चर्चा झाली.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव तारीक बागवान, सहप्रभारी शांभवी शुक्ला, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबणावे, तसेच जिल्हा अध्यक्ष राहुलराज पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विश्वास : नवीन नियुक्तीबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार यांनी, देवदास माने यांच्या संघटन कौशल्याचा व पक्षनिष्ठेचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वामुळे कराड तालुक्यात युवक काँग्रेस अधिक सक्षम होईल आणि पक्षाच्या धोरणांचा प्रभाव तळागाळापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

काँग्रेमध्ये सक्रिय : कराड तालुक्यातील मालखेड या गावचे सुपुत्र असलेले देवदास माने हे गेली दोन दशके काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष ते जिल्हा सरचिटणीस अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहेत.

वेगळी ओळख : इंधन दरवाढ, गॅस टंचाई, शेतकरी प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आंदोलनात सहभाग घेतला आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना मदत अशा सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ही जबाबदारी म्हणजे कामाची पावती आहे. युवकांचे प्रश्न सोडवून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार 

– देवदास माने (नवनियुक्त तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस, कराड) 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!