भाजपाची वाटचाल संघटनशक्तीवर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. अतुल भोसले; कराड दक्षिण मंडलात महाप्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ; कार्यकर्त्यांनी विकासधारा जनतेपर्यंत पोहोचवावी

कराड/प्रतिनिधी : –

संघटनशक्ती, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेले ठोस निर्णय यांमुळे भारतीय जनता पार्टी देशभर यशस्वी वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले.

उद्घाटन : कराड दक्षिण मंडलाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विजयनगर (ता. कराड) येथील पार्वती लॉन्स येथे आयोजित या निवासी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, बूथप्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आवाहन : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रहित, सुशासन आणि सर्वांगीण विकास या मूल्यांवर आधारित कार्यपद्धतीमुळे भाजपाने जनतेचा विश्वास संपादन केला असल्याचे सांगताना डॉ. भोसले यांनी, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.

जनसंघ ते भाजप प्रवास : या प्रशिक्षण शिबिरात सदस्य नोंदणी, पक्षाचा इतिहास, विकासकार्य, सोशल मीडिया व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)चा वापर, नमो अ‍ॅप व सरल अ‍ॅप, शासनाच्या योजना, बूथ व्यवस्थापन यांसह पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा विविध मान्यवरांनी घेतला. जनसंघापासून भाजपापर्यंतचा प्रवासही यावेळी उलगडण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, शैलजा शिंदे, प्रियांका साळुंखे, पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, अर्जुन कराळे, धनंजय पाटील, वर्षा निकम, माधवी पाटसुपे, विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, शिवाजीराव पवार, तेजस सोनावले, हणमंतराव जाधव, शंकराव खबाले, हर्षवर्धन मोहिते, पिनू जाधव, चिन्मय कुलकर्णी, रेणूताई येळगावकर, तेजस जमदाडे, वैष्णवी वायदंडे, किशोरी शिंदे, रोहिणी शिंदे, स्मिता हुलवान, कविता कचरे, डॉ. राजेंद्र पाटील, माणिकराव पाटील, राजेंद्र यादव, प्रवीण साळुंखे, शंकर निकम, सुषमा लोखंडे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!