आ.डॉ. अतुल भोसले वाढदिवस साजरा करणार नाहीत 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्राचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी शनिवारी (दि. २८) होणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसिद्धीपत्रक : याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे, की सध्याच्या शोकमय वातावरणात वाढदिवस साजरा करणे उचित नसून, या दिवशी ते नागरिकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा स्वीकारणार नाहीत.

आवाहन : वाढदिनी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, सत्कार किंवा उत्सव आयोजित करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करून, सर्व सहकारी व कार्यकर्त्यांनीही साधेपणा पाळून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!