माजी सैन्याधिकाऱ्यांचा सन्मान व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकाराने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; सामाजिक योगदानाचा गौरव

कराड/प्रतिनिधी : –

भाजपाचे नगरसेवक सुहास जगताप यांच्यावतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरात देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतमाता प्रतिमा व अमर जवान ज्योत प्रतिकृतीचे पूजन करून तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी तिरंग्यास मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले.

सन्मान : या प्रसंगी भारतीय वायुसेना दलाचे निवृत्त अधिकारी डी.एच. कुलकर्णी, मेजर देशपांडे, तसेच रजनीश ढवळे यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

प्रवासी बॅग वितरण : याप्रसंगी कराड शहराला राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्वच्छता पुरस्कार मिळवून देणाऱ्या नगरपालिकेच्या सर्व स्वच्छता पथकातील मुकादम, तसेच सोमवार पेठेतील स्वच्छता कर्मचारी यांचा प्रवासी बॅग देऊन गौरव करण्यात आला.

सत्कार : स्वीकृत नगरसेवक म्हणून सुहास जगताप (भैया) यांची निवड झाल्याबद्दल स्वच्छता पथकाच्या वतीने प्रदीप कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. याच कार्यक्रमात गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने ओम योगा क्लासेस चालवणाऱ्या सौ. वनमाला जोशी यांचाही शाल, श्रीफळ व प्रवासी बॅग देऊन सन्मान करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी यांनी केले, तर आभार सौ. शामला देशपांडे यांनी मानले. या कार्यक्रमाला भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. वैष्णवी वायदंडे, सौ. शारदाताई माने, सौ. किशोरी शिंदे, नगरसेवक विजय वाटेगावकर, भाजप शहराध्यक्षा सौ. सुषमा लोखंडे, सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, विश्वनाथ फुटाणे, प्रमोद शिंदे, सौ. नूतन वाघ, सोपान तावरे, संजय शहा, शैलेश गोंदकर, सौरभ शहा, अभिषेक भोसले, रमेश मोहिते, केतन शहा, राहुल आवटे, अनिल लोखंडे, दिलीपराव जाधव, सुरज देसाई, सागर माने, सौ. कल्पना जगताप, सौ. शामला देशपांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!