‘व्ही.एस.आय.’ कडून घोषणा; सभासदास राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार
कराड/प्रतिनिधी : –
पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने व्ही.एस.आय.च्या २ पुरस्कारांवर मोहोर उमटविली आहे.












