‘कृष्णा’वर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अभिवादन करण्यात आले. स्व. जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांच्या सहकारातील योगदानामुळे कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कृष्णाकाठ समृद्ध झाला असल्याच्या भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.

अभिवादन : कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील,बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, दिपक पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील आदींसह मान्यवरांनी आप्पासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृष्णा कृषी महाविद्यालयातही अभिवादन : दरम्यान, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयातही मान्यवरांनी स्व. जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!