कराड/प्रतिनिधी : –
कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पवित्र स्मृतींना १०१ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
मान्यवरांकडून अभिवादन : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, सुदन मोहिते यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.












