विजय दिवस समारोह समितीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
विजय दिवस समारोह समितीच्या वतीने दरवर्षी १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत कर्नल संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध राष्ट्रीय, सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उद्घाटन : या शिबिराचे उद्घाटन अॅड. संभाजीराव मोहिते आणि सातारा जिल्हा शिवसेना उपप्रमुख नितीन काशीद यांच्या हस्ते करण्यात आले.
सेवाभाव व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ : यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे सर्वोच्च सामाजिक दान असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होते, असे प्रतिपादन केले.












