समाजभूषण बाबुराव गोखले स्मृतिदिनानिमित्त प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

‘समाजसेवा आणि आनंद’ या विषयावर डॉ. ज्योतीराम कारंजकर करणार मार्गदर्शन

कराड/प्रतिनिधी : –

समाजभूषण कै. पुरुषोत्तम पांडुरंग तथा बाबुराव गोखले यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त एक प्रेरणादायी व्याख्यान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समाजकार्यातील योगदानासाठी त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी घेतला जाणारा हा उपक्रम यंदाही उत्स्फूर्तपणे पार पडणार आहे.

सुप्रसिद्ध वक्ते : या स्मृतिदिनानिमित्त डॉ. ज्योतीराम दत्तात्रय कारंजकर (M.A., M.S.W., B.Ed., गीतातत्व, ज्ञानेश्वरीतज्ज्ञ, कराड यांचे ‘समाजसेवा आणि आनंद’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. समाजसेवेच्या विविध पैलूंचा अभ्यास, सेवा कार्यातील मूल्ये, तसेच निःस्वार्थ कार्यातून मिळणारा आत्मिक आनंद याबाबत डॉ. कारंजकर मार्गदर्शन करणार आहेत.

आयोजक : या कार्यक्रमाचे आयोजन कै. बाबुराव गोखले स्मारक समिती, कराड यांच्यावतीने करण्यात आले असून, वि. के. जोशी (कार्यवाह), माधव माने (कार्यवाह), विठ्ठलराव शिखरे (कार्याध्यक्ष) आणि सुभाषराव जोशी (अध्यक्ष) यांनी, या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण : या कार्यक्रमाचे ठिकाण नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालय, सोमवार पेठ, कराड असे असून, कार्यक्रम रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे.

आवाहन : समाजसेवेत रुची असणाऱ्या, तसेच बाबुराव गोखले यांच्या कार्याला आदर्श मानणाऱ्या नागरिकांनी या व्याख्यानाला उपस्थित राहून आपले ज्ञान समृद्ध करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!