Edition

‘कृष्णा’वर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन

Share करें

✓ Link copy हो गया!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कराड/प्रतिनिधी : – 

येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांना त्यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कारखान्याचे व्हा. चेअरमन जे. डी. मोरे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत स्व. आप्पासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

अभिवादन : याप्रसंगी संचालक लिंबाजी पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, सुनील पाटील, संग्राम पाटील, अरविंद पाटील, आनंदा खबाले, अविनाश खरात, छबन कांबळे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर, जयवंत शुगरचे संचालक वसंतराव पवार, दिपकनाना जाधव आदींसह मान्यवरांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मान्यवरांची उपस्थिती : स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून आप्पासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज कृष्णाकाठ समृद्ध आणि सुजलाम्-सुफलाम् झाला आहे अशा भावना मान्यवरांनी मनोगतात व्यक्त केल्या. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail