लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

राज्याचे माजी सहकार मंत्री, लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांची ८७ वी जयंती मंगळवार, दि. १५ जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त कोयना सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय, लोकनेते विलासकाका पाटील प्रवेश‌द्वार, मार्केट यार्ड, कराड येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रेरणादायी योगदान : स्व. विलासकाका पाटील यांचा जन्म १५ जुलै १९३८ रोजी झाला. जिल्हा परिषद सदस्य ते सलग ३५ वर्षे आमदार, तसेच महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी अतिशय प्रभावीपणे कार्य केले. विशेषतः सहकार क्षेत्रात व ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरिता त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी राहिले आहे.

आवाहन : या अभिवादन कार्यक्रमात स्व. विलासकाका यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी, तसेच सहकार क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, विविध संस्थाचे प्रतिनिधी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मंगळवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळेत अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन रयत संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोफत आरोग्य शिबीर

लोकनेते स्व. विलासकका पाटील-उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. १७ जुलै रोजी कराड मार्केट यार्ड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मोफत निसर्गोपचार व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचीची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!