नीट आणि जेईई परीक्षेत घवघवीत यश; पाच वर्षांतील यशाच्या चढत्या आलेखावर टाकणार प्रकाशझोत
कराड/प्रतिनिधी : –
येथील सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी, शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी, कराडच्या विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षा 2025 मध्ये सुयश संपादन केले आहे. या यशवंत विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कार सोहळ्याचे बुधवार (दि. 25) जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. कृष्णामाई मंगल कार्यालय, सोमवार पेठ, कराड येथे दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अकॅडमीचे संस्थापक प्रा. सुमीत यादव यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती : या विशेष सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि हिंदू एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची उपस्थिती लाभणार आहे. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कराडमधील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. राहुल फासे उपस्थित राहणार आहेत.
यशवंत विद्यार्थी : सुभीत अकॅडमीची विद्यार्थिनी आंचल ओसवाल हिने नीट परीक्षेत 720 पैकी 557 गुण मिळवून सुयश मिळवले. तर सायली शेलार हिने 508 गुण, अफान बागवानने 502 गुण, हर्षिता लखापती हिने 444 गुण, कृष्णा राऊत याने 394 गुण, तसेच पायल शिंदे हिने 340 गुण मिळवले. तसेच जेईई ॲडव्हान्स परीक्षेत आर्यन पवार या विद्यार्थ्याने 111 गुण मिळवत संपूर्ण देशात 2097 वा क्रमांक मिळवला आहे. या यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
अकॅडमीच्या चढत्या आलेखावर प्रकाशझोत : या कार्यक्रमात अकॅडमीचे संस्थापक प्रा. सुमीत यादव अकॅडमीच्या पाच वर्षांतील यशाच्या चढत्या आलेखावर प्रकाशझोत टाकणार असून अकॅडमीकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दर्जेदार शिक्षण, तज्ञांचे मार्गदर्शन व अन्य सुविधांबाबत उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. सुमीत यादव यांनी केले आहे.
