‘कृष्णा’ची गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार; १० वी १२ वीत विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल कौतुक

कराड/प्रतिनिधी : –

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या पाल्यांनी इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कृष्णा कारखान्याच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील,धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे डी मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, दीपक पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रेरणादायी पुस्तके भेट : गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी कृष्णा कारखाना सातत्याने कौतुकाची थाप टाकत आहे. संचालक मंडळाने विद्यार्थ्यांना धडपडणाऱ्या तरुणाईसाठी, यश अपयश आणि मी, किमयागार कार्व्हर, एक होता कार्व्हर, ताई मी कलेक्टर व्हयनू, माती, पंख आणि आकाश अशी प्रेरणादायी पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत केले. एच आर मॅनेजर संदिप भोसले यांनी प्रस्ताविक केले. मोहन कदम यांनी आभार मानले.

या विद्यार्थ्यांचा केला सत्कार

इयत्ता १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी अपूर्वा जगताप व मोनिका धर्मे, १० वी मधील गुणवंत विद्यार्थी वैष्णवी यादव, श्रेया लोहार, आदर्श जाधव, वेदिका मोहिते, श्रेया माळी, संग्रामराव जाधव, अर्णव सूर्यवंशी, वेदांतिका गिरीगोसावी, सृष्टी सावंत, मयुरी धुमाळ, स्वराली मोहिते, ओमकार पाटील, तेजस सातपुते, तन्मय शिर्के, शर्वरी जाधव, अजित पाटोळे, वेदांत जगताप, आदित्य हिवरे या विद्यार्थ्यांचा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!