आमचे मित्र, आमचे चेअरमन… मा. अजितजी (काका) थोरात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मा. अजितजी (काका) थोरात यांचा वाढदिवस आज रविवार दि. १ जून रोजी साध्या पद्धतीने संपन्न होत आहे, त्यानिमित्त… 

अजितकाका ज्योतीराम थोरात हे कराड तालुक्यातील रा. मलकापूर (कराड) येथील एक आदर्श व्यक्तिमत्व. बीएपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. शालेय व महावि‌द्यालयीन जीवनामध्ये त्यांनी मोठा मित्रपरिवार निर्माण केला. सामाजिक कार्यासोबत शेतीची आवड जोपासली. शेतीमध्ये त्यांनी चांगली बैलजोडी पाळण्याचा छंद जोपासला. आजही त्यांच्याकडे उत्तम बैलजोडी आहे.

मळाई ग्रुपमध्ये काम करीत असताना ग्रुपमधील श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था, आदर्श जुनिअर कॉलेज व चव्हाण विद्यालय – मलकापूर, आनंदराव चव्हाण वि‌द्यालय – पोतले, श्रीमती कन्या शाळा – मलकापूर, न्यू इंग्लिश स्कूल – कासारशिरंबे, स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज – मलकापूर, आदर्श प्राथमिक वि‌द्यालय – मलकापूर, आदर्श प्राथमिक वि‌द्यालय – आ. नगर, जमना सहकारी ग्राहक संस्था – मलकापूर, आदर्श क्रीडा संस्था – कराड, कराड तालुका अॅमयुचर अथलेटिक असोसिएशन कराड, समाजप्रबोधन सार्वजनिक वाचनालय – मलकापूर, विज्ञान प्रबोधनी – मलकापूर, यशवंत कृषी विकास संस्था कराड, यशवंत फळे, फुले, भाजीपाला खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित कराड, मलकापूर जिमखाना असोसिएशन मलकापूर या सर्व संस्थांमध्ये ते सभासद असून संस्थांच्या कारभारामध्ये फार मोठे योगदान आहे.

महावि‌द्यालयीन जीवनात त्यांनी खेळाची फार मोठी हौस जोपासली. त्यातूनच त्यांनी धावण्याच्या स्पर्धा खेळल्या व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम ते कराड तालुका अॅमेझॉन अॅथलेटिक असोसिएशन मार्फत करतात. त्यांना नेमबाजीचा शौक असून ते गेली अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर नेमबाजी करीत आहेत. त्यासाठी त्यांना मा. शिवाजीराव थोरात व सारंग शिवाजीराव थोरात यांचे सहकार्य लाभले. सहकार क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान असून जखिणवाडीत विविध विकास सेवा सोसायटीमध्ये अनेक वर्ष संचालक व चेअरमन म्हणून त्यांनी काम केले आहे. आज घडीला ते सोसायटीचे चेअरमन आहेत. सहकारी दूध संस्था, सहकारी ग्राहक संस्था यांमध्येही ते संचालक म्हणून काम करतात.

मलकापूर नगरपरिषदेमधील नगरसेवक व विरोधी पक्ष नेता म्हणून गेल्या पंचवार्षिक योजनेत त्यांनी चांगले काम केले. सर्वच पक्षांमध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत. मा. स्व. विलासकाका पाटील यांचा युवा कार्यकर्ता व त्यानंतर मा. उदयसिंह पाटील यांचा सहकारी मित्र म्हणूनही त्यांनी काम केले. मा. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासोबत गेले अनेक वर्ष सामाजिक व राजकीय कार्य करीत आहेत.

श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये अनेक वर्षे संचालक व सध्या चेअरमन म्हणून अजित थोरात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकिर्दीत पतसंस्थेच्या ठेवी, स्वनिधी व नफ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. कुटुंबामध्ये एक मुलगा, एक मुलगी व एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंबात कसे राहावे, याचा आदर्श त्यांनी इतरांनी घालून दिला  आहे. मळाई ग्रुपमधील सर्व संस्थांचे पदाधिकारी, मा. अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अजितकाका थोरात यांची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. मळाई ग्रुपच्या वतीने त्यांना दीर्घायुष्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

– दादासाहेब केरु कदम – गरुड

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!