कराड/प्रतिनिधी : –
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशानुसार शिवसेनेतर्फे कराड शहरात कराड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी तिरंगा रॅलीच्या आयोजन करण्यात आले आहे.
वेळ व शुभारंभ : मंगळवार (दि. २०) रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ शिवतीर्थ दत्त चौकातून करण्यात येणार आहे.
रॅलीचा मार्ग : शहरातील शिवतीर्थ दत्त चौकापासून या रॅलीला सुरुवात झाल्यानंतर त्यानंतर ही रॅली आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा, कृष्णा नाका मार्गे विजय दिवस चौकात येऊन या ठिकाणी रॅलीची सांगता करण्यात येणार आहे.
भारतीय सैन्यदलाचा सन्मान : पाकिस्तानचे कंबरडे मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पाडणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ ही तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.
आवाहन : या रॅलीमध्ये कराड शहर व तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी मित्र, सर्व सामाजिक संस्था, गणेश व नवरात्र मंडळे, पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण संस्था, माजी सैनिक यांनी भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते, यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी केले आहे.