कराड/प्रतिनिधी : –
वसंतगड- तळबीड – शिवडे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठीच्या 2 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आयटी सेलचे सारंग पाटील यांच्या हस्ते पार पडले.
श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून निधी : सातारा जिल्ह्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून वसंतगड तळबीड- वराडे- हनुमानवाडी- शिवडे या रस्त्याला निधी मंजूर झाला आहे.
मान्यवरांची उपस्थिती : या रस्ता भूमिपूजनास बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ नलवडे, सरपंच अमित नलवडे, ग्रामपंचायत सदस्य सुहास कदम, योगेश गुरव, जालिंदर जामदार, कविता निंबाळकर, शारदा येडगे, सुरेखा पाचुकते, राजश्री महाडिक, वसंतगड सेवा सोसायटीचे सदस्य दत्तात्रय गुरव, रत्नमाला जामदार, शंकर निंबाळकर, लक्ष्मण महाडिक, संतोष पाटील, आबासो कोकरे, संभाजी कोकरे, मोहन नांगरे, तानाजी वाघमारे, आनंदा मोहिते, ग्रामसेवक विशाल मोहिते, उद्योजक रवी जामदार, विठ्ठल चव्हाण, मधुकर गायकवाड, ठेकेदार महेश पाटील आदी उपस्थित होते.
लोकांच्या विकासाचा विचार : सारंग पाटील म्हणाले, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी नेहमीच लोकांच्या विकासाचा विचार केला. सातारा जिल्ह्याने साहेबांची नेहमीच पाठराखण केली. लोकांच्या विकासाला चालना देण्यासाठी रस्त्याचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे.